Attack On Police :संगमनेरमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ला,शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून निषेध

संगमनेर : संगमनेर शहरात जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. संचार बंदी काळात गस्त घालत असताना दिल्ली नाका परिसरात गुरुवारी (6 मे) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सहा जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याचे आणि गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola