ATS Raid Pune | पुण्यात कोंढव्यात ATS ची मोठी कारवाई, Terror कनेक्शनचा तपास सुरू
Continues below advertisement
पुण्यातील कोंढवा परिसरात ATS आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे 18 ठिकाणी छापेमारी केली. 2022-23 मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या संदर्भात संशयितांवर दोन ते तीन वर्षांपासून पाळत ठेवली जात होती. नव्याने काही देशविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न आहे का, हे तपासण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन आणि 10 लॅपटॉप तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. आतापर्यंत 20 जणांची चौकशी करण्यात आली असून, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र 18 ते 20 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कोंढव्यात 'I love Mohammad' चे बॅनर्स लागल्याचेही समोर आले असून, पोलीस या अनुषंगानेही तपास करणार आहेत. संशयितांकडे अमली पदार्थ सापडल्याचीही माहिती मिळाली आहे. यापूर्वी 2022-23 मध्ये कोंढव्यातील Ashok Amuse सोसायटीमधून अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांच्या संपर्कात हे संशयित होते. त्यांच्या हालचालींवर केंद्रीय यंत्रणांची नजर होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement