ABP News

Astha Dahikar On Nagpur Rada: रिक्षा अडवली, धमकी दिली, तोडफोड, शिववीगाळ लेक अडकली, आई रडली

Continues below advertisement

Astha Dahikar On Nagpur Rada: रिक्षा अडवली, धमकी दिली, तोडफोड, शिववीगाळ लेक अडकली, आई रडली

राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल. तसेच जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. नागपूरच्या महल आणि हंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या (Nagpur riots) पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.  महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. याठिकाणी गुंतवणूक येत आहे. आपल्याला इच्छित उद्दिष्ट गाठायचे असेल तर नागरिकांना कायदा-सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. सध्या अनेक धर्मांचे सण सुरु आहे. त्यामुळे सर्व लोकांना संयम बाळगावा आणि एकमेकांविषयी आदरभाव बाळगावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram