Ajit Pawar Beed : अजित पवारांचा ताफा आडवण्याचा आश्रम शाळा शिक्षकांचा प्रयत्न

Ajit Pawar Beed : अजित पवारांचा ताफा आडवण्याचा आश्रम शाळा शिक्षकांचा प्रयत्न

 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज जिल्ह्याच्या प्रशासकीय बैठकीसाठी आले आहेत. सकाळी अजित पवार हे हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात दाखल झाले. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगेच आपल्या कामाला आणि भेटीगाठींना सुरुवात केली. यावेळी काही लोक अजित पवार यांना भेटले. त्यांच्याशी बोलताना अजित पवार यांनी बीडमधील (Beed News) जनतेने डोक्यातून जातीचे खूळ काढले पाहिजे, असे आवाहन केले.

कुठंतरी मागे झालेल्या चुका आता टाळल्या पाहिजेत. आता आपल्याला नवीन पिढीसाठी काहीतरी केले पाहिजे. तुम्ही थोडं दम धरा, मी काय करतो ते बघा. बीडमध्ये अनेक गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न आहे. एकदा डोक्यातील जातीचं खूळ काढून टाका. सगळी हाडामासांची माणसं आहेत, सगळ्यांचं रक्त लालच आहे. परंतु, मी इथलं राजकारण गेली अनेक वर्षे बघतोय, जातीच्या मुद्द्यावरुन समाजात फूट पाडायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची, हे सुरु आहे. इतक्या वर्षांमध्ये बीडला किती मंत्रीपदं आणि पदं मिळाली, पण विकास काय झाला, याचा विचार केला पाहिजे. मी महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कुठल्याही महापुरुषांविषयी माझ्या मनात श्रद्धेची, मानाची आणि आदराची भावना आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola