Ashok Chavhan | सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल : अशोक चव्हाण
अशोक चव्हाण म्हणाले, आम्हा विश्वास आहे की, हायकोर्टाने ज्या निकषांच्या आधारे आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला आहे. ते देखील कोर्टात आम्ही अगोदरच मांडल आहे. त्यामुळे विश्वास आहे उच्च न्यायालयात ज्या पद्दतीने आरक्षण टिकलं. त्याच पद्दतीने सर्वोच्च न्यायालयात देखील टिकेल. आज आमची जी बैठक झाली त्याबाबतची संपूर्ण माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मी स्वतः फोन करून दिली आहे. यासोबतचं खासदार संभाजी राजे यांच्याशी देखील फोनवरुन चर्चा केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कशा पद्दतीने लढाई लढली जाईल याची संपुर्ण माहिती त्यांना दिली आहे.