Ashok Chavhan : माझं नाव घेतल्याशिवाय काहींना जेवणच जात नाही: अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
Continues below advertisement
भाजप (BJP) नेते आणि खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेडमध्ये बोलताना आपल्या राजकीय विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली आहे. 'काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, ही त्यांची अडचण आहे,' अशा शब्दात चव्हाण यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले. सध्या जिल्ह्यात खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं ठरवण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. निवडणुकीच्या राजकारणात अशा गोष्टी होत असतात, पण आपण कुणाचीही चिंता करत नाही, असेही ते म्हणाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चव्हाण सातत्याने आपल्या भूमिकेचे समर्थन करत आहेत आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement