Ashish Shelar on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची टोल बंद करण्याची मागणी, शेलारांची टीका

Continues below advertisement

Ashish Shelar on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची टोल बंद करण्याची मागणी, शेलारांची टीका

Mumbai Entry Point Toll :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करण्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली आहे. मुंबईतील फक्त दोनच नाही तर पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल माफ (Mumbai Entry Point Toll) करावे अशी मागणी मनसेचे प्रवक्ते संजय शिरोडकर यांनी केली आहे. या टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रवेश करण्यासाठी अथवा बाहेर पडताना पाच एन्ट्री पॉईंट आहेत. या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल माफी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या मागणीवर आशिष शेलार यांनीही टीका केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram