Ashish Shelar : सभागृहात कामकाज सुरू असताना आमदारांना दमदाटी
Ashish Shelar : सभागृहात कामकाज सुरू असताना आमदारांना दमदाटी संसदेत धुसखोरीचा प्रकार बुधवारी घडला, आणि आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रेक्षकांच्या गॅलरीतून आमदारांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते आणि देशोन्नती या वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहरे यांनी आशिष शेलार यांचं निवेदन सुरू होण्याआधी वरून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शेलार यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. पोहरे यांना बाहेर नेण्य़ाचे आदेश पीठासीन अध्यक्ष चेतन तुपे यांनी तातडीनं सुरक्षा रक्षकांना दिले.