Ashish Shelar : आणीबाणीला पाठिंबा देणारे लोकशाहीवर बोलतायत? उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आणीबाणीला पाठिंबा देणारे लोक आज लोकशाहीवर गप्पा मारत असल्याचा आरोप शेलार यांनी केला. शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटले की, "मोदीजींना महाराष्ट्रावर नाही खरं तुम्हाला मुंबईवर सूड घ्यायचा आहे." शिवाजी महाराज पार्कवरील मेळाव्यातील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची ज्वलंत परंपरा उद्धव ठाकरे यांनी चिखल केल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला. आजचे भाषण खचलेल्या, हरलेल्या, पराभव मान्य केलेल्या, दमलेल्या आदित्यच्या बाबाची कहाणी होती, असेही शेलार म्हणाले. आशिष शेलार यांनी एका पोस्टद्वारे ही टीका केली आहे. मुंबईकर उद्धव ठाकरे यांना ओळखून आहेत आणि अद्दल घडवायला आतुर आहेत, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. धमक्या कुणाला देता, असा प्रश्नही शेलार यांनी विचारला.