Shelar's Attack : 'तुम्ही Mumbai साठी काय केलं?', Ashish Shelar यांचा Thackeray बंधूंना थेट सवाल
Continues below advertisement
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधू आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 'तुम्ही मुंबईसाठी काय केलं हे सांगा,' असा थेट सवाल शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केला आहे. तुमच्या हिंदुत्वाचा रंग आता टिळक भवनकडे गेल्यामुळे बदलला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. इतकंच नाही तर, रोज सकाळी वाजणारा भोंगा तोंडावर आपटतो आणि पुन्हा उभा राहतो, अशा खोचक शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. आम्हीच मुंबईची खरी सेवा करत आहोत आणि हिंदुत्वाचे रक्षण करत आहोत, असा दावाही शेलार यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement