Vote Jihad: 'उद्धव ठाकरेंना खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप

Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मतदार याद्यांमधील त्रुटी आणि दुबार मतदारांवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी 'वोट जिहाद'चा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे, मनसे आणि शरद पवार गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचंय,’ असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांच्या मते, विरोधक केवळ हिंदू मतदारांच्या चुका दाखवत आहेत, जे 'वोट जिहाद'चे लक्षण आहे. या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, भाजपने निवडणुकीसाठी धार्मिक मुद्द्यांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. 'आशिष शेलार वैफल्यग्रस्त झाले आहेत,' अशी टीका मनसेने केली, तर उद्धव ठाकरेंनी शेलारांच्या टीकेला उत्तर देताना, शेलारांनी फडणवीसांनाच 'पप्पू' ठरवल्याचा टोला लगावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola