Ashish Giri : कायद्यानुसार ज्याचा पक्ष आहे त्यालाच संपत्ती मिळायला हवी- आशिष गिरी
विधीज्ञ आशिष गिरी यांनी शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कायद्यानुसार ज्याचा पक्ष त्यालाच संपत्ती मिळायला हवी असं गिरी यांचं म्हणणं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बहाल केलं आहे. त्यासंदर्भात ठाकरे गटानं दिलेल्या आव्हानाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी २४ एप्रिलला होणार आहे. त्याचदिवशी आपल्या याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी गिरी यांनी केली आहे.
Tags :
Petition Lawyer Shiv Sena Bhavan Shiv Sena Shinde . Bow And Arrow SUPREME COURT Ashish Giri All Branches Shiv Sena Fund Party Symbol