पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदारांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा अशी मागणी माजी आमदार आशिष देशमुखांनी ही मागणी केली आहे. नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा प्रकरणी त्यांनी ही मागणी केली आहे. आशिष देशमुखांनी तसं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. नागपूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असताना सुनील केदारांनी खासगी दलालमार्फत त्यांनी सरकारी रोख्यामध्ये त्यांनी पैसे गुंतवले असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.