Australian Open Tennis : अॅश्ले बार्टीचा एतिहासिक विजय, 44 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन महिलेला विजेतेपद
Continues below advertisement
जागतिक टेनिस क्रमवारीत नंबर वनवर असलेल्या अॅश्ले बार्टीनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अॅश्ले बार्टीनं अमेरिकेच्या डॅनियल कॉलीनचा पराभव करत ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. तिनं कॉलिन्सचा 6-3, 7-6 असा दोन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. अॅश्ले बार्टी ही ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावणारी गेल्या 44 वर्षातली पहिलीच ऑस्ट्रेलियन महिला ठरली. 1978 साली ख्रिस ओनिलनं ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा किताब पटकावला होता. पण त्यानंतर एकाही ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूला घरच्या मैदानावरची ही स्पर्धा जिंकता आली नव्हती. दरम्यान 2019 च्या फ्रेंच ओपन आणि गेल्या वर्षीच्या विम्बल्डननंतर अॅश्ले बार्टीचं हे तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं.
Continues below advertisement