Ashadhi wari Pandharpur : पंढरपुरात आषाढी वारीची जोरदार तयारी; पत्राशेड बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात

Continues below advertisement

Ashadhi wari Pandharpur : पंढरपुरात आषाढी वारीची जोरदार तयारी; पत्राशेड बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात प्रशासनाची तयारी जोरदार सुरु असून गोपाळपूर परिसरात १३ पत्राशेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे . आषाढी यात्राकाळात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग या १३ पत्राशेड भरून रांजणी रोडला ८ ते १० किलोमीटर लांब जात असते . यासाठी या गोपाळपुर येथे ११ दर्शन मंडप उभारण्यात आले असून रांजणी रोडला २ दर्शन मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . या पत्राशेड मध्ये यंदा भाविकांना मिनरल वॉटर , लिंबू सरबत , नष्ट , चहा व भोजन दिले जाणार आहे . या भागात सर्वत्र सीसीटीव्ही बसवले जाणार असून ठिकठिकाणी मंदिरातील विठुरायाच्या थेट दर्शनाच्या स्क्रीन लावल्या जाणार आहेत . दर्शन मंडपाच्या शेजारी वृद्ध भाविकांना विश्रांती कक्ष उभारण्यात येत असून याठिकाणी गरजेनुसार वैद्यकीय उपचार देण्याचे नियोजन करण्यात येत आहे . 
 च्या गर्दीमुळे यंदा विक्रमी यात्रा भरणार असल्याचे चित्र दिसत आहे . 
      

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram