Ashadhi Ekadashi Wari 2021 : देवी रुक्मिणीचा पालखी पंढरपूरकडे रवाना

 विदर्भातील प्रतिपंढरपूर आणि रुक्मिणीचं माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणीचा पालखीसोहळा कालच पंढरपूरकडे रवाना झाला. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं. कौंडण्यपूर पालखीला ४२७ वर्षांची परंपरा आहे. यंदा कोरोनामुळे पायी वारी नाही, त्यामुळे एसटीनं आणि मोजक्या कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या ४० वारकऱ्यांसह पालखीनं काल पंढरपूरडे प्रस्थान ठेवलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola