Ashadhi Ekadashi | पंढरपुरात २०-२२ लाख वारकरी दाखल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न
पंढरीच्या आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपुरात साजरा होत आहे. वारकरी मोठ्या संख्येने पंढरीनगरीमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता फडणवीसांसह विठ्ठलाची पूजा केली. विठ्ठलाच्या मूर्तीला दुहेर्याचा अभिषेक करण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची आरती झाली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेचीदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटी भक्तीचा जनसागर लोटलेला आहे. चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. "जवळपास वीस ते बावीस लाख वारकरी आज आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल झालेले आहेत।" अशी माहिती मिळाली आहे. प्रशासनाने गर्दीचे नियोजन केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः माईक हातात घेऊन गर्दीचे नियंत्रण केले. चंद्रभागेत स्नानासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध आहे. उजनी धरणातील पाणी व्यवस्थापनामुळे पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला नाही. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. फुलांची आकर्षक सजावट मंदिराला करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांची पूजा चालू असतानाही भाविकांचे मुखदर्शन चालू ठेवण्यात आले. VIP दर्शन पूर्णपणे बंद केल्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे. दर्शनाला लागणारा वेळ तीस तासांवरून अठरा ते वीस तासांपर्यंत कमी झाला आहे. यंदा प्रशासनावर ताण जास्त आहे आणि गर्दीही जास्त आहे.