Gadchiroli Flood : पुरामुळे तब्बल 10 हजार ग्रामस्थांचं स्थलांतर ABP Majha

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 28.8 मिलिमीटर पावसाची नोंद, जिल्ह्यातील 21 मार्ग सध्या बंद अवस्थेत, गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 28 गेट उघडण्यात आले आहे त्यातून 2.30 क्युमेक्स जलविसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना दिला अति सतर्कतेचा इशारा, पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचे असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन, सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा महा बंधाऱ्यातून 85 गेट उघडण्यात आले आहे त्यातून 27,65,085 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रणिता, वैनगंगा, गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे ह्या नदीकाठावरील गावांना तत्काळ खाली करण्यात आले आहे .. ह्या पुराचं सर्वाधिक फटका हा अहेरी आणि सिरोंचा तालुक्याना बसला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola