Mumbai Drugs Case : आर्यन खानची दिवाळी तुरुंगातच? 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ
क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या कोठडीत वाढ असून 30 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता मंगळवारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आर्यनची दिवाळीही तुरुंगात होणार की घरी हे आता हायकोर्टात ठरणार आहे. कारण विशेष एनडीपीएस न्यायालयानं आर्यनचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळल्यानंतर जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आर्यनचे वकील आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न करणार आहेत. या प्रकरणात लवकर सुनावणी झाली नाही तर आर्यनची दिवाळी तुरुंगातच होऊ शकते.