Arvind Sawant : चंद्रचूड यांनी न्यायालयाला चूड लावली, अरविंद सावंतांची बोचरी टीका
Arvind Sawant : चंद्रचूड यांनी न्यायालयाला चूड लावली, अरविंद सावंतांची बोचरी टीका
कोणत्या नियमांतर्गत निशिकांत दुबेंना बोलायला दिलं जाते जॅार्ज सोरसचं प्रकरण अदानीवर आरोप केल्यावर काढले गेलं. अमेरिकेत अदानीवर आरोपपत्र दाखल झाले आहे. अमेरिकेने सांगितलं की अदानीनं पैसे करप्शनसाठी वापरले. त्यावर चार दिवस सर्वजण गप्प बसले. यावर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत. जॅार्ज सोरस संदर्भात आरोप करा पण पुरावा द्या अदानीवर आरोप केल्यावर असे विषय काढले जातात.. ३० सेकंदात सभागृह बंद पाडले. कर्नाटकी सरकार सातत्यानं अतिशय वाईट भूमिका घेत असतं. चंद्रचूड यांनी न्यायालयाला चूड लावली… न्याय व्यवस्था दबावाखाली आहे. सुप्रीम कोर्टात सीमा प्रश्न प्रलंबित आहे. शिवसैनिक आजही सीमा प्रश्नासाठी लढणार बांग्लादेशातील घटना भयंकर आहे. हिंदूंवर अत्याचार होताहेत. मंदिरावर हल्ले होताहेत. विश्वगुरू स्वतःला म्हणता पण ते तुम्हाला धमकावताहेत. मोदी अवाक्षर काढले नाही. जनतेवर अत्याचार होतंय आणि मूग गिळून गप्प बसले आहेत.