Arvind Sawant Eknath Shinde Special Report : रिक्षावाला शब्दावरुन अरविंद सावंतांचा यू-टर्न
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शरद पवारांबद्दल एक मोठा दावा केलाय.. रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं पवार मविआ स्थापनेच्या वेळी एकनाथ शिंदेंबद्दल म्हणाले होते असं विधान अरविंद सावंत यांनी केलंय.. मुंबईतील मानखुर्दमधील सभेत सावंत यांनी हा दावा केला. मात्र एबीपी माझानं याची बातमी दाखवल्यावर सावंत यांनी पूर्णपणे यू-टर्न घेतला. रिक्षावाला शब्द पवारांनी वापरला नाही, तो शब्द माझा आहे.. शिंदेंच्या हाताखाली काम करणार का, असं पवार म्हणाले, अशी सारवासारव सावंत यांनी केली. दरम्यान या सावतांच्या विधानानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केलीय..