Konkan Petroglyph : कोकणातील कातळशिल्प जागतिक नकाशावर, युनोस्कोच्या यादीत स्थान

कोकणातल्या सड्यांवर आढळून येणारी कातळशिल्प अभ्यासाचा आणि कुतुहलाचा विषय आहेत. कोकणातील ही कातळशिल्प जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्यात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील सात कातळशिल्पांना युनोस्कोनं प्राथमिक यादीत स्थानही दिलंय. आता हीच कातळशिल्प जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली जातेय. पुढच्या दीड महिन्यात संबंधित समितीच्या कामाला वेग येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात सुमारे १७०० हून अधिक कातळशिल्प आढळून आलीत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola