Arnab Goswami | अर्णब गोस्वामी यांनी कोठडीत असताना मोबाईल वापरल्याची माहिती; खातेनिहाय चौकशी सुरु
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल फोन वापरल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे. अलिबाग येथे न्यायालयीन कोठडीत असताना मोबाईल वापरल्याची शक्यता आहे. अलिबागमधील क्वॉरटांईन सेटंरच्या शाळेत ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.