Nilesh Ghaywal : गुंड निलेश घायवळच्या भावाला गृहराज्यमंत्र्यांकडून शस्त्र परवाना
Continues below advertisement
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुख्यात गुंड निलेश घायवड यांच्या भावाला, सचिन घायवड याला शस्त्र परवाना दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सचिन घायवडवर गंभीर गुन्हे दाखल असतानाही हा परवाना देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, सचिन घायवडला शस्त्र परवाना देऊ नये, असा पोलिसांचा अहवाल होता, तरीही योगेश कदम यांनी २० जून २०२५ रोजी हा परवाना दिला. या प्रकरणी विरोधकांकडून मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. योगेश कदम यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, "सर्व बाबी तपासून शस्त्र परवाना दिला आरोपांमधे तथ्य नाही." निलेश घायवड हा कोथरूडमधील गोळीबार प्रकरणानंतर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सचिन घायवडवर खंडणी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न यांसारखे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणावरून गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी शस्त्र परवाना देण्याच्या प्रक्रियेत मंत्र्यांचा हस्तक्षेप नसतो, असे म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement