Kokan : सुपारी म्हणुन आणलेली वस्तू अडकित्त्याने फोडताक्षणी स्फोट, सदर वस्तू बॉम्ब असल्याचा संशय

Continues below advertisement

मुलाने आणलेली सुपारी सदृश्य वस्तू सुपारी समजून हाताळत असताना झालेल्या स्फोटात ओटवणे येथील लक्ष्मी सखाराम देवळी यांच्या हाताची बोटे तुटल्याचा खळबळजनक प्रकार दुपारी तीनच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावी घडला आहे. मुलाने सुपारी म्हणुन आणलेली वस्तू आईने अडकित्त्याने फोडताक्षणी मोठा आवाज आला व काही कळायच्या आत स्फोट होवून हाताच्या चिंधड्या उडाल्या. यामध्ये डाव्या हाताची करंगळी तुटून पडली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास सुरु आहे. दरम्यान सदर वस्तू बॉम्ब सद्रश असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून सध्या तपास सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram