Aravind Sawant on Narayan Rane : महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरु आहे : शिवसेना खा.अरविंद सावंत
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन होतंय आणि या निमित्तानं एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र येतायत. विमानतळावर सुरु असलेल्या पोस्टर वॉरमुळे या कार्यक्रमात काय होणार? याची झलक पाहायला मिळाली आहे. नारायण राणे यांनी उद्याच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा देऊन वादाची नांदी दिलीय तर रोणेंच्या विधानावरल प्रतिक्रीया देताना अरविंद सावंत यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोप केला आहे.