Police Recruitment : पोलिस भरतीसाठी 18 लाख 27 हजार उमेदवारांचे अर्ज, चाचणीचं व्हिडीओ रेकॉर्डिंग
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 04:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील पोलिस शिपाई आणि चालक पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी १८ लाख २७ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच, एका जागेसाठी १०० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार आहे. तसेच २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होईल. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक चाचणीचे व्हिडिओ रेकॅार्डींग, सीसीटीव्ही रेकॅार्डींगही होणार आहे