Annasaheb Patil Mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईटबंद, लाभार्थ्यांची अडचण, तरुणांना फटका

Continues below advertisement
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची (Annasaheb Patil Mahamandal) वेबसाईट गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याने मराठा समाजातील (Maratha Community) हजारो होतकरू तरुणांची कर्ज प्रक्रिया आणि नोंदणी थांबली आहे, ज्यामुळे समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. 'ते जे एमडी आहेत ना एमडी जे नवीन बसवले ते मराठाद्रोही आहेत ते अजित पवार आणि भुजबळांच्या दबावाखाली काम करणारे आहेत,' असा गंभीर आरोप मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात (IT Era) सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत एक महिन्यापासून वेबसाईट बंद असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे. या बैठकीत महामंडळाच्या कामकाजातील अडथळे आणि वेबसाईटच्या मुद्द्यावर जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola