Anna Suraksha Yojana : 25 लाख शेतकरी 'अन्नसुरक्षे'विना? शेतकरी म्हणतात...

Continues below advertisement

आता बातमी आहे राज्यातल्या जवळपास २५ लाख शेतकऱ्यांच्या घरात पेटणाऱ्या चुलीची... या चुलीवर २०१५ पासून अन्नसुरक्षा योजनेतंर्गत दोन ते तीन रुपये दरानं मिळणारं अन्नधान्य शिजत होतं.. पण आता या शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित रहावं लागू शकतं. दुष्काळाच्या काळात शेतकरी उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारनं १५ ऑगस्ट २०१५ पासून एक महत्त्वाची योजना सुरु केली होती.  शेतकऱ्यांच्या एपीएल शिधा पत्रिकेचा अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आला होता.  तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू, अशा प्रकारे एका कुटुंबाला प्रति महिना जास्तीत जास्त 25 किलो धान्याचा लाभ देण्यास पात्र ठरविले होते. मात्र आता ही योजना सरकारनं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram