Anna Bansode NCP : Ajit Pawar यांनी कोणताही निर्णय घ्यावा, मी त्यांच्या सोबत राहिन

विरोधीपक्ष नेते अजित पवार जो निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत मी असेन. अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे. अण्णा बनसोडे आज मुंबईत जाऊन अजित पवारांची भेट ही घेणार आहेत. हे तेच अण्णा बनसोडे आहेत जे पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांसोबत होते. शेवटच्या क्षणापर्यंत अण्णा यांनी अजित पवारांना त्यावेळी ही पाठिंबा दिला होता, आता ही अजित पवार भुकुंप करतील. अशी चर्चा सुरू असताना, तेच अण्णा त्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार झालेत. दादा जो निर्णय घेतील त्याला माझी सहमती असेल अन शेवटपर्यंत मी त्यांच्या सोबतीने असेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola