ABP News

Anjali Damania : दिवसभरात Dhananjay Munde यांचा राजीनामा घ्या, नाही तर जनहित याचिका दाखल करु

Continues below advertisement

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बीडमधील वाल्मिक कराडची दहशत आणि मंत्री धनंजय मुंडेंचे व त्यांच्या कुटुंबीयांचे वाल्मिक कराडशी असलेले व्यक्तिगत संबंध, तसेच आर्थिक संबंधाचे पुरावेही त्यांना दिले. तसेच, मी अजित पवारांना जे पुरावे दाखवले ते त्यांनी बारकाईने पाहून घेतले असून ते नक्कीच गंभीर आहेत. त्यामुळे, ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, आज दुपारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तत्पूर्वी आज कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना व अंजली दमानिया यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण उत्तर देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 

अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेऊन राजीनामा मागितला, त्यासंदर्भातील प्रश्नावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया अजित पवार यांना भेटल्या, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्री अजित पवार यावर उत्तर देतील आणि त्यांनीच द्यावं अशी माझी अपेक्षा आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच,  अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर बोलताना, राखेसंदर्भात थर्मस पावर स्टेशननं केलेला तो कचरा आहे, तो कचरा साफ करायचं काम संबंधित स्टेशनचं आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने 2006 च्या निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे, प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा निर्णय येतच नाही, असेही मुंडे म्हणाले.  

आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून होणाऱ्या आरोपावरही धनंजय मुंडेंनी भूमिका मांडली, क्षीरसागर यांना माहिती असेल तर आरोपींचे आणि त्यांचे संबंध आहेत. कृष्णाला काय झालंय हे पोलिसांना माहिती असेल. मागील एक महिन्यापासून बीडच सुरू आहे, माध्यमांचा रुतबा, मान आता कमी होत चालला आहे. काय खरं, काय खोटं हे तपासणी केल्यानंतर माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे, ट्रायल चालली पाहिजे, असे म्हणत धनंजय मुंडेंनी माध्यमांनाही लक्ष्य केलं. तसेच, ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांना फास्टट्रॅक कोर्टात नेलं पाहिजे या भूमिकेवरुन माझ्यात कुठलाही बदल नाही, असेही मुंडेंनी पुन्हा म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram