Anjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर, दुप्पट दराने खरेदी, मुंडेंवर गंभीर आरोप

Continues below advertisement

Anjali Damania: डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोप
 चार दिवसाचा मी सरकारला अल्टिमेटम दिल होतं चार दिवसांमध्ये राज्य सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे होता, सरकारने राजीनामा घेतला नाही   या चार दिवसांमध्ये मी पुरावा गोळा करून उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे बद्दल मोठा खुलासा करणार आहे  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले मात्र धनंजय मुंडे दोघांचे अतिशय जवळचे असल्यामुळे धनंजय मुंडे वर कारवाई होत नाही आहे,  जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही तो पर्यंत या प्रकरणात न्याय होणार नाही,  धनंजय मुंडे हे एक मंत्री म्हणून मला मान्य नाही हे, जर असे लोक जे दहशतवाद करतात अत्याचार करतात वाल्मिकी कराड आणि कैलास फड सारखा लोकांना मोठा करतात अशा लोकांना विधानसभेत जाऊन माझ्यासारखा लोकांसाठी आपल्या सगळे सामान्य जनतेसाठी न्याय बनवणार असणार तर आम्हाला मान्य नाही...   ऑन देशमुख कुटुंबीयांना नामदेव शास्त्री महाराज यांचा पाठिंबा  नामदेव शास्त्री महाराज जर खरंच देशमुख कुटुंबीयांचा पाठीमागे असतील. त्यांनी त्या देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी ज्या ज्या विघ्न जी आहेत ती दूर करावी अशी विनंती आहे त्यातला सर्वात मोठा विघ्न म्हणजे धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे तोपर्यंत इथे न्याय होणार नाही म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनामा च काम आता भगवान गडानेच करायला हवा तरीच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल.    उद्या पत्रकार परिषद मोठा खुलासा  आतापर्यंत आपण मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या राख घोटाळा काळे पैसे त्यांच्या खात्यात कसे आले सरकारी कंपनीचा फायदा एका मंत्राला कसा झाला हे दाखवला त्यांच्या जमिनी दाखवलं त्यांच्या आर्थिक व्यवहार दाखवला त्यांच्या आणि वाल्मिकी कराड यांच्या जवळीक दाखवले उद्या जे मी पत्रकार परिषद घेऊन पुरावा दाखवणार आहे ते त्यांच्या मंत्री असताना भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा असणार आहे कसा यंत्रणांच्या गैरवापर केला जातो त्याच्या देखील खुलासा करणार आहे हे पुरावे मी भगवानगडावर देणार आहे, आणि मागणी करणार आहे तुम्ही दिलेला त्यांना पाठिंबा काढून घ्या, दुसरी मागणी अशी असेल हे पुरावा मी जे दिलं हे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर त्यांनी तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामाचे मागणी करायला हवे, असं जर झाला तर पूर्ण महाराष्ट्र भगवान गडाला नमन करेल.    ऑन नामदेव शास्त्री महाराज अंजली दमानिया पुरावा कोर्टाकडे द्या तुम्ही धनंजय मुंडे सारखा व्यक्तीला वेळ देऊ शकता तर माझ्या सारखा सामान्य स्त्रीला व्यक्तीला जिला अतिशय आदर आहे तुमचं जी समाजासाठी लढते तिला जर आपण वेळ दिला नाही तर चुकीचा होईल, मला जे पुरावे द्यायचे आहे ते पुरावे देण्यासाठी तुमच्याकडे यायचं आहे तुम्ही मागणी नाकारू नका असा विनंती करणार आहे.   ऑन चार दिवसाच्या अल्टिमेटम आणि पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा मला सरळ सरळ दिसते धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे फार जुने मित्र आहेत त्यांनी अगदी तरुणपणा पण एकत्र काम केलं, त्यांनी भाजपा युवा मोर्चात एकत्र होते म्हणूनच त्यांच्या इतके जवळच्या संबंध आहे देवेंद्र फडणवीस हे विसरतात ते मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र जनतेचा कल्याण करणे हे त्यांच्या कर्तव्य आहे पण ते सातत्याने विसरत चालले आहे असा दिसत आहे याव्यतिरिक्त अजित पवार मंत्रिपदाचा राजीनामा पक्ष अध्यक्ष म्हणून घ्यायला हवा होता तो देखील त्यांनी घेतला नाही अगदी थेट पुरावे दिल्यानंतर देखील घेतला गेला नाही नवीन पुरावे त्यांच्याकडे पाठवायचे व्यवस्था मी करणार आहे आता मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेट घेणार नाही जर त्यांनी राजीनामा घ्यायचं होता तर पहिल्याच पुरावे भरपूर होते हे पुरावे मी भगवानगडावर पाठवून भगवान  भगवान गडाने धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घ्यावा असा मी नामदेव शास्त्री महाराजांना विनंती करेन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola