Anis Ahmed : काँग्रेसमधून वंचितमध्ये गेलेले अनिस अहमद पुन्हा स्वगृही

Continues below advertisement

Anis Ahmed : काँग्रेसमधून वंचितमध्ये गेलेले अनिस अहमद पुन्हा स्वगृही
 काँग्रेसमध्ये माझी काही नाराजी होती म्हणून मी काँग्रेसमध्ये राहून वंचित चा एबी फॉर्म घेण्यास गेलो होतो - ⁠ मात्र वेळेवरती न पोहोचू शकल्यामुळे तो अर्ज भरु शकलो नाही - ⁠ रागात मी हा निर्णय घेतला मात्र त्यानंतर मला कळलं की हा चुकीचा निर्णय आहे आपण काँग्रेस विचाराचे  आहोत म्हणून पुन्हा काँग्रेसमध्ये आलो - ⁠ लहानपणी वडिलांनी मला असंच रागवल्यानंतर मी चोवीस तास घरातून निघून गेलो होतो मात्र कळल्यानंतर पुन्हा आलो तसंच आता येतोय - ⁠ माझी आता कोणतीही नाराजी नाही कारण काँग्रेस मुळेच एवढं काही मी करू शकलो

हे ही वाचा..

सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही कोणी केलेला नव्हता. हा मुद्दा कोणी काढला हे सांगायची गरज नाही. पण एकाच गोष्टीचं वाईच वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत स्वच्छ व्यक्तीमत्व म्हणून ज्यांचं नावलौकीक होतं. अशा स्वच्छ, राजकारणी आणि नेत्याबद्दल त्यांच्या पश्चात्य उलटी-सुलटी चर्चा होणं हे अशोभनीय आहे. हे घडलं नसतं तर आंनद झाला असता. जी व्यक्ती जाऊन नऊ नर्ष झाली आणि त्यांचा लौकिक संपुर्ण देशामध्ये एक अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक नेता त्यांच्यासंबधी अशी चर्चा होणं हे योग्य नाही. पण, सत्ता हातात असल्यानंतर आपण काही बोलायला मुक्त आहोत. हा समज काही लोकांचा असतो. कदाचित त्याचाच हा एक भाग असेल, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे. 

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार? 

70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र, माझ्या सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर मला बोलवून आर आर पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावमध्ये बोलताना केला. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram