Anil Patil on Eknath Khadse : सून मंत्री झाल्याने खडसेंची भाषा बदलू शकते, अनिल पाटील कडाडले

Continues below advertisement

Anil Patil on Eknath Khadse : सून मंत्री झाल्याने खडसेंची भाषा बदलू शकते, अनिल पाटील कडाडले क्षा खडसे यांना मंत्री पद जाहीर झाल्यानंतर त्यांच्या शपथ विधी साठी एकनाथ खडसे देखील गेले आहे त्यांच्या जन्यवरती मंत्री अनिल पाटील यांनी सडकून टीका केली आहे.  मंत्री अनिल पाटील यांची एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका  एकनाथ खडसे भाजपलाच तत्त्वज्ञान शिकवायला लागले आहेत, ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना फोडण्याचा कामच देवेंद्र फडणवीस यांनी केलं   आणि म्हणून महाराष्ट्रात हे वातावरण तयार होऊन त्याचा फटका लोकसभेत बसला   मात्र सून आता भाजपमध्ये मंत्री झाल्याने एकनाथ खडसे यांचे भाषा आता बदलू शकते   परंतु एकनाथ खडसे हे स्वयंघोषित करून भाजपमध्ये घुसले त्यांची ही भूमिका लोकांना आवडली नाही आणि त्यामुळे एक लाख मत ही आमची कमी झाली   एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये घेण्यास मंत्री अनिल पाटलांचा विरोध  एकनाथ खडसे यांचा प्रवेश का रखडला याची दिल्लीत चर्चा झाली आहे मात्र गल्लीत याबद्दल कोणाला काही माहीत नाही   भाजपने त्यांना घ्यावं नाही घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र दोन पक्ष फोडले म्हणून आपलं नुकसान होत असेल   असं जर त्यांचं म्हणणं असेल तर काही लोकांना पक्षात घेऊ नये असा सल्ला महायुती म्हणून आमचा काही लोकांना असेल   एकनाथ खडसे यांना भाजप तर सोडा मात्र रक्षा खडसेने तरी बोलावलं का याबद्दल मला शंका आहे   सुनेचा शपथविधी आहे त्यांनी गेलं पाहिजे त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत   मात्र भाजपकडून एकनाथ खडसे यांना निमंत्रण केलं असेल असं काही मला वाटत नाही महायुतीमध्ये जर त्यांना सामावून घेतलं जरी काही लोक आपल्याला आवडत नसली तरी त्यांच्यासोबत काम करावंच लागतं   एकनाथ खडसे यांचे महायुतीत नक्कीच स्वागत करू पण जर भाजपने पंगत मध्ये डुक्कर सोडण्याचे काम केलं तर नक्कीच आमच्याकडून विरोध देखील होईल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram