Anil Parab PC : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार बुडाले तर भाजप नेते भरपाई देणार का? अनिल परब यांचा सवाल
Continues below advertisement
ST Workers Strike Live Updates : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतरही राज्यभरात कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा कामगारांना आवाहन केलं आहे. अनिल परब यांनी म्हटलं की, हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू. यात भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे, असं परब म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Mumbai BJP Bombay High Court Msrtc High Court ST Strike State Transport BJP Anil Parab PC Maharashtra ST Employee Protest ST Employee Protest Anil Parab On ST Workers Strike