Shiv Sena vs BJP : शिवसेना नेते आणि मंत्री Anil Parab यांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश दिले?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2021 10:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी राणेंच्या अटकेचे आदेश दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यावरून भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं नालासोपाऱ्यात तक्रार दाखल केलीय. रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत असताना परब यांना एक फोन आला. त्यावेळी फोनवर बोलत असताना ते अटक करण्याबाबत बोलत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा दावा भाजपनं केलाय. नालासोपारा इथं भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या विश्वास सावंत यांनी तुलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई होणार का याबाबत उत्सुकता आहे.