Anil Parab ST Workers : Ultimatum संपला! संपकरी कामगारांवर सरकारकडून बडतर्फीचं हत्यार

Continues below advertisement

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देऊनही काही ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यानंतर अखेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर राज्य सरकारकडून आजपासून  बडतर्फीची कारवाई करण्यात सुरूवात झाली आहे. गेले अनेक दिवस कामावर हजर न राहिल्यानं  महामंडळाने हे पाऊल उचललं आहे. 

कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आजपासून कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.  सोमवारपर्यंत कामावरती हजर राहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावा लागणार असल्याच परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता.  त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही त्यानंतर राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram