Anil Parab Dapoli Property : अनिल परबांची संपत्ती जप्त, जाणून घ्या कारवाईतील 5 महत्वाचे मुद्दे

Continues below advertisement

शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल परबांची दहा कोटी वीस लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीय. ईडीनं ट्विट करून ही माहिती दिली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रत्नागिरी जिल्ह्यातली 42 गुंठे जमीन आणि तिथं बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान यासंदर्भात दापोलीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram