Anil Parab on ST Strike : ST कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार, कामावर परतण्याचे आवाहन

Continues below advertisement

ST Workers Strike Updates : एसटी कर्मचाऱ्यांनी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई करणार नसल्याची ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री आणि एसट महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केले आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतरही कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मात्र कारवाई होणार असल्याचे त्यांनी म्हटले. हायकोर्टाच्या आदेशानंतर आता एसटी संपाचा तिढा सुटण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

एसटी संपाबाबत आज हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत आज हायकोर्टाने राज्य सरकार, एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांना आदेश दिले. एसटी संपाबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानंतर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. परब यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, प्रशासन कारवाई करणार नाही असे सात वेळेस आवाहन केले होते. हायकोर्टातही आम्ही हीच भूमिका मांडली. कर्मचाऱ्याची नोकरी जावी म्हणून कारवाई केली नाही. मात्र, प्रशासन म्हणून शिस्तभंगाची कारवाई करावी लागली होती. आता कोणतीही कारवाई करणार नसल्याचे हायकोर्टात महामंडळाने सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram