Anil Parab आणि J. M. Abhyankar यांना ठाकरेंकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

Continues below advertisement

Anil Parab आणि J. M. Abhyankar यांना ठाकरेंकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

मुंबई: लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 26 जून रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Camp) उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब (Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून आतापासूनच विधानपरिषद निवडणुकीची (VidhanParishad Election 2024) मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. 

अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब यांचा  विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ सत्तावीस जुलै रोजी पूर्ण होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन विधान परिषदेच्या रिंगणात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram