Anil Deshmukh Case : अनिल देशमुख आजही चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार नाही ABP Majha
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आजही चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार नाहीत. देशमुख वकिलांमार्फत ईडीच्या नोटीशीला उत्तर दिलंय. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग ईडी कार्यालयात पोहोचले. ईडी मनी लाँड्रिंगप्रकरणी देशमुखांना ईडीनंं पाचवं समन्स बजावलंय. ईडीनं अटक करू नये यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिला होता. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्याविरोधात ईडी कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.