Anil Deshmukh : खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांचा अर्ज ABP Majha

जेजे रुग्णालयात उपचारासाठीच्या सुविधा अपुऱ्या असल्यानं  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागणारा अर्ज राष्ट्रवादी नेते अनिल देशमुखांनी कोर्टात दाखल केला आहे.. याबाबत ४ मे रोजी पुढील सुनावणी होईल. अनिल देशमुख यांनी आज कोर्टात आपल्या आजारांबद्दल स्वतः न्यायाधीशांना माहिती दिली. आपल्याला खांदेदुखी व -हदय विकाराची समस्या असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. याबाबत जेजे हॉस्पिटलकडून यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ असं न्यायालयाने म्हटलं , तसंच घरचं जेवण मिळण्याबाबतही ४ मे रोजीच सुनावणी करण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola