Anil Deshmukh: पद गेल्यानंतरही Nana Patole आणि Anil Deshmukh यांचा मुक्काम सरकारी बंगल्यात ABP Majha

Continues below advertisement

सध्या राज्यातल्या दोन बंगल्यांबाबत निर्णय घेण्याचा यक्षप्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आहे. त्यातला एक बंगला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा तर दुसरा बंगला आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा. या दोघांनाही बंगले रिकामे करण्याची नोटिस पाठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची प्रतीक्षा सध्या सामान्य प्रशासन विभागाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी पद गेल्यानंतरही नाना पटोले आणि अनिल देशमुख यांचं सरकारी बंगल्यात वास्तव्य आहे. नाना पटोलेंनी तर बंगला रिकामा करण्याऐवजी त्यात काँग्रेसचं पक्ष कार्यालय स्थापन करण्याची परवानगी सामान्य प्रशासन विभागाकडे मागितली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर आता मोठा प्रश्न उपस्थित राहिल्याचं दिसतंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram