Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख

Continues below advertisement

Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख 

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (16 डिसेंबर) नागपूरमधील (Nagpur) राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेनेच्या 11 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र या शपथविधीनंतर शिंदे गटाच्या काही आमदारांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली. यावर महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आम्ही अडीच वर्षांचा मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची माहिती दिली.   आम्ही पक्षात ठरवले आहे की अडीच वर्षांचं मंत्रिपद असेल. त्यामुळे अनेक लोकांना संधी देऊ शकतो. जो काम करेल त्याला संधी मिळेल. जो विभाग ज्याला मिळेल तिथे त्याने पूर्ण काम करून दाखवले पाहिजे. जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रकारांनी भाजपचा देखील अडीच वर्षांचं मंत्रिपद असेल, असा फॉर्म्युला ठरला आहे का?, असा सवाल केला. यावर आम्ही प्रत्येक मंत्र्यांच्या परफॉर्मन्स ऑडिट करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram