गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख दिल्लीत, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत तासभर खलबतं!
Continues below advertisement
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली. दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा अशी जवळपास तासभर खलबतं केली. यावेळी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टातले वकील राहुल चिटणीस आणि इतर जवळपास पाच ते सहा वकिलांची फौजही सिंघवी यांच्या 'अनीतायन' या निवासस्थानी हजर होती. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याबाबत काय पाऊल उचलता येईल यावर या बैठकीत मंथन झालं आहे. बैठकीनंतर कुठलीही प्रतिक्रिया न देता अनिल देशमुख हे तिथून निघाले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांचं पुढचं पाऊल आता काय असणार याची उत्सुकता आहे.
Continues below advertisement