Anil Deshmukh In High Court : सीबीआयकडून दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख हायकोर्टात

मुंबई : सीबीआयकडनं दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रातील आरोपांची प्राथमिक चौकशी करून सीबीआयनं हा गुन्हा दाखल केला आहे. 24 एप्रिलला अनिल देशमुखांच्या राज्यभरातील निवासस्थानांवर छापे टाकून सीबीआयनं नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी देशमुखांची चौकशीही केली होती. या छापेमारीत सीबीआयनं अनेक कागदपत्रं आणि इतर साहित्य आपल्या ताब्यात घेतलं आहे. मात्र याप्रकरणी तपासयंत्रणेला आपण पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून त्यांना रोखावं अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola