Dasara Melava Special Report : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात 63 कोटींचा खर्च? भाजपचा दावा काय?

Continues below advertisement
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार, हा हल्ला केवळ एक राजकीय बनाव होता. नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात 'बी फायनल रिपोर्ट' सादर केला आहे. या अहवालात फॉरेन्सिक तपासणीचे निष्कर्ष देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांच्या कारची काच विशिष्ट प्रकारची असल्याने ती सहज फुटली नसती, तसेच त्यांच्या डोक्यावरील जखम काच लागून झाल्यासारखी दिसत नाही, असे अहवालात नमूद आहे. कारमध्ये सापडलेला दगड मागच्या खिडकीतून येऊन समोर बसलेल्या व्यक्तीला लागणे अशक्य असल्याचेही तपासात समोर आले आहे. या अहवालामुळे भाजपने अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. "एखाद्या विजय मिळवण्याकरता, निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोठा घेऊन स्वतःलाच मारणे आणि जनतेची सहानुभूती मिळविण्याचा एक केविलवाना प्रयत्न केला गेला होता हे आता पोलिस चौकश-चौकशीतून उघड झालं," असे भाजपने म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola