Anil Deshmukh Attack | अनिल देशमुखांवरील हल्ला खोटा? पोलीस अहवालाने खळबळ
Continues below advertisement
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात हा हल्ला खोटा असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. पोलिसांनी न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टनुसार, अनिल देशमुख यांच्या कारसमोरची काच रिनफोर्स तंत्राच्या सहाय्याने तयार केली होती, त्यामुळे दगड मारल्यावर ती तडकली असती पण तुटली नसती. तसेच, काच तुटल्यावर जशी जखम होते, तशी जखम देशमुखांना झालेली दिसत नाही. गाडीत मिळालेला दगड मागच्या बाजूने आल्याचे सांगण्यात आले होते, परंतु मागच्या बाजूने आलेला दगड डोक्याच्या समोरील बाजूस लागणे अशक्य असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. या संदर्भात अनिल देशमुख सकाळी नऊ वाजता माध्यमांशी बोलणार आहेत. अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे की, कारची काच तुटल्यामुळे कपाळावर जखम झाली होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement