Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या ओसडीनं नोंदवलेल्या जबाबाचा ईडी चार्जशीटमध्ये उल्लेख ABP Majha

 पोलिसांच्या बदल्यांवरून राज्यात आधीच घमासान माजलेलं असताना आता त्यासंदर्भात रोज नवनवे गौप्यस्फोट होतायत. बदल्यांपूर्वी अनिल देशमुख, अनिल परब आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक व्हायची अशी माहिती अनिल देशमुखांंचे 
'ओएसडी' रवी व्हटकर यांनी ईडीला जबाब दिलाय. ईडी चार्जशीटमध्ये रवी व्हटकर यांच्या या जबाबाचा उल्लेख करण्यात आलाय. अनिल देशमुख यांच्या कार्यालयात राज्यभरातील आमदारांकडून पोलिस बदल्यांसाठी शिफारशी यायच्या आणि शिवसेनेकडून यादी घेऊन अनिल परब यायचे आणि त्यानंतर यांच्यात गुप्त बैठका होत असंत. बदल्यांपूर्वी होणारी ही बैठक गोपनीय असल्यानं त्याचं कोणतंही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचं रवी व्हटकर यांनी जबाबात सांगितल्याचं कळतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola