Anil Desai Opposed by Congress : अनिल देसाईंसह काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची, वाद चव्हाट्यावर!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मुंबईतील महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येतंय, मविआमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर पांजर पोळ परीसरात प्रचारासाठी आले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि बाचाबाची करत त्यांना निघून जाण्यास सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजर पोळ या ठिकाणी ते गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला. अनिल देसाईंनी या ठिकाणाहून निघून जावं, त्यांनी या ठिकाणी प्रचाराला येऊ नये अशी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये काहीवेळ बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.